मुरगूडात शिवप्रेमींच्या वतीने सदाशिवराव मंडलिक यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेत शिवभक्त धोंडीराम परीट व शिवप्रेमींच्या वतीने लोकनेते दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी नगरसेवक किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण गवाणकर, नगराध्यक्ष राजेखान जमादार, विकी साळोखे, माजी नगरसेवक सुनील रणवरे यांनी मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Advertisements


शिवभक्त धोंडीराम परीट बोलताना म्हणाले सर्वसामान्य जनतेचे आधारवड व हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून खासदार सदाशिवराव मंडलिक यांची समाजात ओळख असल्याचे सांगत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

Advertisements

यावेळी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, बाजीराव गोधडे, अशोक दरेकर, आनंदा मांगले, दत्तात्रय मंडलिक, आनंदा गोरुले, सदानंद मिरजकर, पत्रकार शशी दरेकर, सोमनाथ येरनाळकर, गौरव मोर्चे, अशोकराव साळोखे, विशाल मंडलिक, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत विकी साळोखे यांनी तर आभार अमित दरेकर यांनी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!