मुंबई : शेती करताना नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो.
विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. आता ही योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.