मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल लिटल मास्टर गुरुकूलमच्या विद्यार्थ्यानीं गुरूकूलमच्या प्रांगणात बाजार भरविला होता . या भरविल्या गेलेल्या बाजारास मुलानीं, पालकानी व परिसरातील नागरीकानी उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या चिमकुल्यांच्या भरवलेल्या बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळे , कांदा , मुळा , रताळे , स्टेशनरी , कटलरी, थंड पेये , खाऊंचे विविध प्रकारचे स्टॉल थाटण्यात आले होते . या बाजाराचे नियोजन श्री . सुभाष अनावकर, आशिष फर्नाडिस , शंकर पालकर यांच्यासह सर्व शिक्षकवृंदानी केले होते.
गुरुकूलमच्या व्यवस्थापिका सौ . सुमन अनावकर यानी सा . गहिनीनाथशी बोलतानां त्या म्हणाल्या मुलानां शैक्षणिक अभ्यासाबरोबर बाहेरील व्यवहारज्ञान मिळावे व त्यातून मुलांच्या ज्ञानात भर पडून त्यांचे ज्ञान वृदीगत व्हावे यासाठीच हा चिमुकल्यांचा बाजार भरविला गेला.
२६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गारगोटी येथे हातात मशाल घेऊन सलग एक तास स्केटींग उपक्रमामध्ये गुरुकूलमचे विद्यार्थी रसिका हुल्ले , श्रावणी पाटील , आर्यन निंबाळकर , शौर्यन साळोखे यानीं सहभाग घेतला होता . या मुलांची नोंद ग्लोबल गिनीज बुका मध्ये व वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाल्याबद्दल नुकताच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मुलानां-पुष्पगुच्छ व मेडल देऊन सत्कार करण्यात आला होता . त्या मुलांचा सत्कारही गुरुकूलमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी
“कांदा -मुळा – रताळे केवळ ज्ञान नव्हे
बाजारही करतात, गुरुकूलमची बाळे ”
सौ. सिंधूताई कोंडेकर यानीं कवितेचे सादरीकरन करून या बाजाराची सांगता झाली.