बाचणी / प्रतिनिधी : खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते सशक्त शरीरातच सशक्तमन कार्यरत राहते त्यामुळेच खेळ हा सरकारी नोकरी मिळण्याचा चांगला मार्ग आहे असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
ते बाचणी तालुका कागल येथे साई दिशा अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद व्होंलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी कोंग्रेसच्या प्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे पाटील तसेच जिल्हा पासींग व्होंलीबॉल चे अध्यक्ष रमेश तोड़कर प्रमुख उपस्थीत होते.
आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, खेळाच्या माध्यमातून चांगले निरोगी शरीरयष्टी आणि देश पातळीवरील खेळाडू घडवण्याचे काम बाचणी सारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय कोच प्रा.अजित पाटील निस्वार्थपणे व सातत्याने करत आहेत त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा मी उभा राहीन.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, मागील दोन वर्षांमध्ये कोरोना सारख्या महामारी मुळे स्पर्धा झाल्या नाहीत. परंतु त्यानंतर नव्या उमेदीने खेळाडू स्पर्धेसाठी तयार झाले आहेत. खेळामुळे देशाचे नाव उज्वल होते. बाचणी सारख्या ग्रामीण भागात केंद्र सरकारचे हॉलीबॉलचे साई केंद्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यानी या स्पर्धेतून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे पाटील म्हणाल्या. खेळामध्ये राजकारण आल्यानं खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. मी देखील या नुकसानीचा एक भाग आहे म्हणून मी राजकारणात जाऊन आमचं नुकसान करणाऱ्यांचा खेळ करणार आहे.
कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त 600 जलतरणपटू नवी मुंबईचे शुभम वनमाळी पुण्याचे राष्ट्रीय हॉलीबॉल मार्गदर्शक डॉक्टर संतोष पवार आणि पुण्याचे राष्ट्रीय व कुलदीप कोंडे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नंदकुमार सूर्यवंशी संजय सबनीस पांडुरंग पाटील माजी सरपंच सूर्यकांत पाटील साई दिशा अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी अजित पाटील नरेंद्र पाटील प्राचार्य सौ अरुणा अजित पाटील शिवसेनेचे अशोक पाटील शिवाजी ठाकरे इमरान नायकवडी आदी प्रमुख उपस्थित होते.