व्हन्नूर : व्हन्नूर ता. कागल येथील श्री दौलतराव निकम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम होत्या. श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दौलतराव निकम विद्यालयाच्या चौफेर यशाबद्दल कौतुक करून ग्रामीण भागातील एक आदर्शवत शाळा असल्याचे सांगितले.
यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवलेल्या लहान गट मुले अथर्व माने,लहान गट मुली मेरी चौगुले,मोठा गट मुले सुरज लोंढे व मोठा गट मुली अनुष्का गुरव तसेच प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळवलेले भाऊसाहेब हजारे,अमोल कांबळे,गणपती हजारे,रावसाहेब हजारे,एन.टी.निकम,राजन कोगनुळकर तसेच व्हन्नूरच्या सरपंच पूजा मोरे,पिंपळगाव खुर्दच्या सरपंच शितल नवाळे,सदाशिव चौगुले,कोगील बुद्रुकच्या सरपंच मधुली गुडाळे यांचे सत्कार करण्यात आले. याचवेळी शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालक वर्गाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार केले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी,संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माता-पालक व शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी व भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन एम.जी. मोरे यांनी केले तर आभार विभाग प्रमुख ए.ए.पोवार यांनी मानले.