मुरगूड शहर पत्रकार दिन उत्साहात
मुरगूड ( शशी दरेकर ) : पत्रकार यांनी मनात आणलं तर उत्तम समाज घडवण्यासाठी प्रबोधन व उपेक्षितानां न्याय देण्याचे काम करू शकतात. सोशल मिडिया मुळे होणारे सामाजिक प्रदूषण ते रोखू शकतात असे उदगार मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी काढले.
पत्रकार दिनानिमित्त मुरगूड येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार चंदकांत माळवदे व वि.रा. भोसले यांचा पत्रकार संघामार्फत सत्कार करण्यात आला.
कागल तालुका प्रेस फोटोग्राफर राजू चव्हाण, पत्रकार ओंकार पोतदार व पोलिस स्वप्निल मोरे यांचा ही सत्कार करण्यात आला.
पत्रकारिता निर्भिड , नि:पक्षपाती असावी व सामजिक समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारितेचा उपयोग व्हावा असे मत वक्त्यांनी मांडले. निवडुंगकार पांडू पाटील यानी जांभेकर यांच्या आठवणीनां उजाळा दिला .
स्वागत समीर कटके यांनी तर प्रास्ताविक मुरगुड पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल डेळेकर यांनी केले यावेळी .श्याम पाटील, प्रकाश तराळे, अनिल पाटील, संदीप सूर्यवंशी ,रवींद्र शिंदे, दिलीप निकम, शशी दरेकर, विजय मोरबाळे ,आदी पत्रकार, जेष्ठ नागरीक उपस्थित होते शेवटीआभार प्रविण सूर्यवंशी यांनी केले.