73,500/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कमेवर चोरटा ने मारला डल्ला
कागल : कागल मधील येशिला पार्क येथील गृहयोग अपार्टमेंट मधील तीन फ्लॅट मध्ये अज्ञात चोरटाकडून चोरी करण्यात आली.
या अज्ञात चोरटा विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अज्ञात चोरटाने सौ. भाग्यश्री प्रदीप बागल यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे टॉप्स, अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याच रिंग व त्याची फूले व रोख रक्कम असे एकूण ६२,०००/- ची चोरी केली.
तर दुसऱ्या फ्लॅट मधून पाऊण तोळ्याचे कानातील दोन सोन्याच्या रींगा, 1500 /- रुपये रोख रक्कम असे एकूण ११,५००/- चा माल चोरीस गेला तर त्या इमारती मधील तिसऱ्या एकमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरटा कडून करण्यात आला. सदर च्या घटना दुपारच्या वेळी झाल्या.
सदर गुन्हाची नोंद पोना. औताडे यांनी करून घेतली तर गुन्हाचा तपास तपास पोहेकॉ. ए. एम. पाटील करत आहेत.