वाघापूर(जोतिराम पोवार) : सत्तेत आलेल्या आमच्या नवनियुक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघापूर गावात दुप्पट वेगाने विकासकामे सुरू करण्याचे आश्वासन बाजार समिती संचालक व वाघापूरचे सुपुत्र, युवा नेते सचिन घोरपडे यानी आज दिले.ते वाघापूर (ता भुदरगड) येथे आमदार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ६० लाखाच्या वाघापूर पैकी गुरववाडी ते बरकाळेवाडी रस्ता डांबरीकरण व साकव अशा संयुक्त कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.नुतन लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या विकास कामाचे उद्घाटन युवा नेते सचिन घोरपडे, लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे आदि मांन्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजप या आघाडीने वाघापूर गावात मोठ्या मताधिक्याने सत्तांतर घडवले. लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या सदस्यांनी पदभार स्विकारला आणि विकासकामांचा धुमधडाका सुरू झाला. पाणी योजनेसाठी नवीन मोटर दुरुस्त करून स्वतः लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे यांनी आपल्या विकास कामाला सुरूवात केली. गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा गुरववाडी ते बरकाळेवाडी हा रस्ता प्रलंबित होता.या रस्त्या साठी आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी रुपये ६० लाख रुपये मंजूर केले व तात्काळ वर्क ऑर्डर होऊन कामाचा आज शुभारंभही करण्यात आला. वाघापूर गावाची पाणी योजना व ग्रामदैवत जोतिर्लिंग देवालयाचे बांधकाम ही कामेही तातडीने मार्गस्थ लावली जातील असे असे आश्वासन बाजार समिती संचालक सचिन घोरपडे यांनी या उद्घाटनप्रसंगी दिले.
यावेळी बोलताना नुतन लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे म्हणाले की, सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने मला वाघापूर या मोठ्या तिर्थक्षेत्राच्या गावचे लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आणून मला मोठा सन्मान दिला त्याबध्दल सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मतदारांचा मी ऋणी आहे. या पाच वर्षात चांगले विकासकाम करून मी साऱ्यांचा उत्तराई होईन.सर्वांचे मी मनपुर्वक आभार मानतो.
या कार्यक्रमासाठी बाळासो शिंदे, तानाजीराव कुरडे, धनाजीराव बरकाळे,श्रीपती दाभोळे, समाधान कुरडे, अमर बरकाळे,शिवाजीराव गुरव, प्रकाश कुरडे, सिताराम सूर्यवंशी, अण्णासो घाडगे, सागर कांबळे, वैभव दाभोळे, नेताजी आरडे, धनाजी एकल, महेश आरडे, आनंदा जठार, प्रताप वारके आदि बहुसंख्य नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते