मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ता. कागलचा मल्ल कौतुक सुरेश शिंदे इयत्ता आठवी याची कोल्हापूर येथील मोतीबाग तालीम येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत ४८ किलो वजन गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
अत्यंत चुरशीच्या आणि खडतर स्पर्धेत तब्बल सात प्रतिस्पर्धी मल्लांना हरवून त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला . अंतिम सामन्यात सांगलीच्या मल्लास चित करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कौतुकची निवड झाली. कौतुक लाल आखाडा संकुल व्यायाम मंडळात सराव करत आहे.
कौतुकला क्रीडा शिक्षक महादेव खराडे,ए . एन .पाटील,संभाजी कळंत्रे,व्ही आर गडकरी,वस्ताद पांडुरंग पुजारी, तुकाराम चोपडे,तर वडिल सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थाप्रमुख प्रा. जयकुमार देसाई, मा.नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, मुख्याध्यापक एस.आर पाटील यांचे प्रोत्साहन लाभले