एस टी स्टॅन्ड येथे केंद्र सरकार चा निषेध
कागल(एस सणगर): केंद्र शासनाने केलेल्या नव्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज, एस.टी.स्टॕड, कागल येथे निषेध करुन निदर्शने करण्यात आली,या आंदोलनात राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी, महाविकास आघाडी, शेतकरी संघटना व शिवराज्य मंच या संघटनेनी सहभाग घेवून केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने,माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, शिवराज्य मंचचे इंद्रजीत घाटगे, संजय हेगडे आय.काॕग्रेस तालुका अध्यक्ष कांबळे यांनी आपल्या मनोगता म्हणाले केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी विरोधी कायदे तसेच १० महिने झाले शेतकरी आंदोलनास बसलेले आहेत, त्यांची दखल सुध्दा केंद्र शासन घेत नाही उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे,लाठीमार करणे या घटना घडत आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण त्या शेतकऱ्यांच्या पाठिंबाशी आहोत, तसेच या शेतकरी विरोधी कायद्याचा विरोध करुन निषेध करतो.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अध्यक्ष संजय चितारी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रविण काळबर, सतीश घाडगे, आनंदा पसारे, कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अंल्पसंख्यांक अध्यक्ष पंकज खलिफ, सुरेश शिंदे, बच्चण कांबळे, सुकुमार कामत, अशोक वड्, सुरेश शेळके, सोहेल मुजावर व मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.