मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर जेष्ठनागरिक संघाला निमंत्रित करुन जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरीकानां राख्या बांधून तसेच मिठाई देऊन बहीण -भावांचा पवित्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम येथिल ” प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय ” मुरगूड यांच्यातर्फे श्रीम . लक्ष्मीबहेनजींच्या प्रेमळ मार्गदर्शनाने मोठया उत्साहात साजरा झाला.
यावेळी राखी पौर्णिमेचा पौराणिक , ऐतिहासिक संदर्भ देऊन बहीण -भावाचा प्रेमळ नात्यांचा संबध व बहीण भावाच्या नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा स्पष्ट केली. या विश्वविद्यालया मार्फत ७ दिवसांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम केल्यास मनःशांती व वर्तन बदल होऊन सर्वत्र प्रेम व शांती निर्माण होईल असे आवाहन त्यानीं केले.
या प्रवित्र रक्षाबंधन कार्यक्रमावेळी संचालक श्री . जयवंत हावळ ,यानीं स्वागत केले . अध्यक्ष श्री . गजानन गंगापूरे यानीं प्रास्ताविक केले . तर संचालक श्री .एम. टी. सामंत यानीं आभार मानले. या कार्यक्रमावेळी सभासद , संचालक , व जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .
Wow, amazing blog format! How long have you been blogging for?
you make running a blog look easy. The whole look of your site is magnificent, let alone the content!
You can see similar here najlepszy sklep