अनेक वाहनावर केली कारवाई
मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बसस्थानक व कॉलेज परिसरात टिंगल- टवाळी करीत फिरणाऱ्या तरुणानां मुरगूड पोलिसानीं कायद्याचा धाक दाखविलयाने तरुणांच्यामध्ये चांगलीच धडकी बसली आहे. याबरोबरच विद्यार्थी -विद्यार्थिनीनां कायद्याचे प्रबोधन केले. शाळा, महाविद्यालय वेळेत बसस्थानक परिसर विद्यार्थी -विद्यार्थिनीनीं गजबजून जातो. शुक्रवारी अचानक मुरगूड पोलिसानीं हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणानां आपला पोलिसी खाक्या दाखविला.
त्यामुळे हुल्लडबाज तरुणांची पळताभुई थोडी झाली . त्याचबरोबर बसस्थानक व कॉलेज परिसरातील विनाकारण घुटमळणाऱ्या मुला -मुलीनाही कठोर शब्दात ठणकावत योग्य मार्गदर्शन केले .आणि त्यानां आपल्या कर्तव्याची व त्यांच्यासाठी राबत असणाऱ्या आई – वडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली.
तसेच वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वाहनावर नंबरप्लेट नसणे, ट्रिपल सिट वाहन चालवणे, लायसंन्स नसणे याबाबत वाहनचालकावर कारवाया करण्यात आल्या. इतर दिवशीही याबाबत अचानपणे कारवाई करणार असल्याचे पोलिस सुत्रातून सांगण्यात आले.
या मुरगूड पोलिसांच्या कारवाईबाबत विद्यार्थी -विद्यार्थिनिचे आई – वडील , नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे .
या मोहिमेत मुरगूड पोलिसस्टेशनचे पीएसआय कुमार ढेरे , स्वप्निल मोरे , कुंभार , यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला .