गडहिंग्लज – धनंजय शेटके
शहरात विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची झुंड फिरत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.शहरात बस स्थानक,आजरा रोड, संकेश्वर रोड,भैरी रोड मार्केट यार्ड परिसर अशा विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्या वेळी अनेक नागरिक बाहेर फिरण्यास पडतात.अशा वेळी ही भटकी कुत्री नागरीकांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध पक्ष व संघटनांनी पालिका प्रशासनानला निवेदने दिली आहेत पण त्याच्या वर अजून काही कार्यवाही झालेली नसून या कुत्र्यांनी एखाद्याचा बळी घेतल्या नंतर पालिकेला जाग येणार काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा अन्यता पालिका अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हि कुत्री आणून बांधण्याचा इशारा दिला आहे.