मडिलगे ( जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळ प्रणित वाघापूर हायस्कूलने याहीवर्षी आपल्या 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत मृणाल दाभोळे याने 92 . 2% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थी असे प्रथम क्रमांक मृणाल शंकर दाभोळे 92.2 %, द्वितीय क्रमांक श्वेता संजय जठार 90.80% , तृतीय क्रमांक आदित्य अर्जुन दाभोळे 89.40%, चतुर्थ क्रमांक नेहा अरुण दाभोळे..87.60%, हिने तर मधुरा मोहन आरडे या विद्यार्थिनीने 86.40% गुण प्राप्त केले.
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक अशोक बरकाळे, वर्गशिक्षिका एस सी गुरव, विषय शिक्षक एस के पोवार, डी पी. पाटील, व्ही.व्ही. कुराडे, जे आय शिंदे, वाय बी शिंदे, जी पी पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले शाळेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे