व्हनाळी (सागर लोहार) : बाचणी ता.कागल येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर बाचणी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्याच्या विद्यार्थ्यांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडीत बसवुन गुलाबपुष्प देवून फुलांच्या पायघड्या, पुष्वृष्टीसह पारंपारिक वाद्याच्या गजरात बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थीही बैलगाडीतून शाळेत जाण्यासाठी आनंदीत झाले होते. शिवाय मोटर गाडीतून थोडासा वेगळा असा बैलगाडीतून प्रवास लहान मुलांना अनुभवता आल्याचे मत पालकांनी यावेळी व्क्त केले.
हो मी माझ्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतच शिकणार…. चलो स्कुल चले हम.. असे नामफलकही या सजवलेल्या बैलगाडीला लावण्यात आले होते. पहिल्यांदाच घरापासून शेळेची पायरी चढताना अनेक विद्यार्थी रडत होते तर कांही नविन मित्र भेटणार या आनंदात शेळेकडे येताना दिसत होते. पहिल्यांदाच नवीन शाळा ,नवा परिसर नवागतांचे डोळे भारावून टाकत होता. दोन वर्षानंतर पुन्हा शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने बहरल्याने शिक्षकही आनंदी वातावरणाने अचंबीत झाले होते.
यावेळी उपस्थीत नवागतांचे मुख्याध्यापक अवेलिन देसा यांच्या हस्ते गुलाबपुष्पदेवून स्वागत करून खाऊ वाटप करण्यात आले. शिक्षक कृष्णात बारड,शिवाजी पाटील,जयवंत पाटील,सुरेश सोनगेकर,श्रीम.शर्वरी भंडारे,मनिषा सुर्यवंशी,शुभांगी मोहिते आदी पालक उपस्थीत होते.