सिद्धनेर्ली (ता.कागल) : येथील राजर्षी शाहू अभ्यासिकेच्या वतीने युपीएससी परीक्षेत 578 क्रमांकाने उत्तीर्ण झालेले स्वप्निल माने यांचा सत्कार तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविलेल्या उच्चशिक्षितांचाही गौरवसोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवराज विद्यालय व ज्युनिअर काॕलेजचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे हे होते.
यावेळी बोलताना साळोखे म्हणाले बुद्धिमत्ता ,गुणवत्ता आणि कार्यक्षमता या गोष्टी बढाई मारण्याच्या नाहीत त्या कसोटीवर सिद्ध कराव्या लागतात.जे करतात ते आपल्या आयुष्यात अविस्मरणीय कर्तृत्व गाजवू शकतात. यावेळी युपीएससी परीक्षेत 578 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल माने यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वप्निल माने म्हणाले की विद्यार्थ्यांनी टी.व्ही,मोबाईलमधील व्हाटसअॕप,इन्स्टाग्राम यामध्ये आपला वेळ न घालवता दररोज पेपरचे वाचन किमान एक तास करणे गरजेचे आहे,स्पर्धापरीक्षेच्या मागील पंधरा वर्षापुर्वीच्या प्रश्नपत्रिका त्यांचे स्वरुप व त्या उत्तरासहित सोडविणे अपेक्षित आहे.जिद्द ,चिकाटी ,भरपूर परिश्रम घ्यायची तयारी ठेवला तर यश निश्चितच मिळेल. ब्रिटिश कौन्सिल आॕफ अल्युमिनी अॕवार्ड प्राप्त संदिप बल्लाळ म्हणाले की मराठी माध्यमातून शिक्षण घेवूनही परदेशात कर्तृत्व गाजविता येते.विद्यार्थ्यांनी न्युनगंड बाळगू नये.
यावेळी एमपीएससी परीक्षेतून सहा.मोटार निरिक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल अक्षय पाटील, शरयु पाटील (एम.डी), मनोज आगळे (एम.बी.बी.एस ), विद्या भोसले (सेट व नेट मराठी), निता कांबळे (एल.एल.बी), संदिप बल्लाळ (ब्रिटिश कौन्सिल आॕफ अल्युमिनी अॕवार्ड) यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सत्कार केला. यावेळी जीवन साळोखे यांनी राजर्षी शाहू अभ्यासिकेला सात हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार, विद्या भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा शुगर जेगरी प्राॕडक्टस चे संचालक एम.बी.पाटील हे होते.कार्यक्रमास सैनिक संघटना सिद्ध नेर्लीचे अध्यक्ष आॕन. कॕप्टन लक्ष्मण पाटील, सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एस.एल.पोवार, पत्रकार पंडीत कोईगडे, जिल्हा बांधकाम संघटणेचे सचिव काॕ. शिवाजी मगदूम,निसर्ग व पर्यावरण संघटणेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे हे उपस्थित होते.स्वागत व प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष डाॕ.अशोक पोवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. विजय मोरबाळे यांनी सुत्रसंचलन अश्विनी पोवार व प्रा.सविता खोत यांनी केले तर आभार पुजा पोवार यांनी मानले.