सिध्दनेर्ली (श्रद्धा सुर्वे) : ता. कागल येथे ५ जून पर्यावरण दिन व ६ जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गेली चार वर्षे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून वृक्षारोपण सुरू आहे. याही वर्षी निसर्ग व पर्यावरण संघटना सिध्दनेर्ली यांच्या वतीने वस्ती ते नदि पात्रापर्यंत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षदिंडीचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. या वृक्षदिंडीत इंदिरा हायस्कूल चे विद्यार्थी, सिध्दनेर्ली विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, सिध्दनेर्ली विद्यालयाचे NCC चे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षीका, संत निरंकारी मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, वारकरी सांप्रदाय, अक्षय ग्रुप तसेच वृक्षमित्र व वृक्ष देणगीदार सहभागी झाले होते. ही दिंडी गावाच्या मुख्य रस्त्यावरून दलित वस्तीकडे जाऊन तेथे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर येवलुजे यांनी संघटनेच्या गेल्या चार वर्षातील वृक्षारोपण संदर्भात केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी व्ही जी पोवार , प्रा.सुनिल मगदूम, ए पी सारंग,तानाजी पाटील,कॉम्रेड शिवाजी मगदूम,भाऊसाहेब लाड ,लक्ष्मण गुरव,दिलीप पाटील,अवधूत पोतदार , अशोक पोवार ,संदीप मगदूम,सुहास बारवाडे,सुधीर पाटील , दिपक पाटील,उमाजी पोवार यांच्या सह निसर्ग व पर्यावरण संघटना सदस्य व वृक्षमित्र उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक विवेक पोतदार यांनी केले.तर आभार दिलीप पोवार यांनी मानले .