मुदाळतिटटा/प्रतिनिधीः महाराष्ट्र राज्याचा कामगार कल्याणमंत्री म्हणून जिल्ह्यात गावागावात काम करत असलेला बांधकाम क्षेत्रातला श्रमजीवी घटक कौटुंबिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. यासाठी मी हिमालयासारखा श्रमिक घटकाच्या पाठीशी असल्याचा ठाम निर्वाळा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसनसो मूश्रीफ यांनी दिला. ते के.पी.पाटील फौंडेशन मुदाळ ( ता.भुदरगड ) यांचे सहकार्याने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगार व त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती साहित्य वाटप व प. बा.पाटील करिअर अकॕडमी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आम.के.पी.पाटील होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी फौंडेशनच्या विधायक कार्याचा आढावा घेऊन के. पी. पाटील फौंडेशनच्या माध्यमातून केवळ पंचवीस दिवसात ७७९ कामगार नाव नोंदणी व २७ लाखाचे अनुदानाचा लाभ मिळवून दिल्याचे सांगितले. यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या पाल्यांच्या हितासाठी जाहिर केलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यांचा लाभ या मतदारसंघात गावागावातील समस्थ बांधवांनी घ्यावा असे आवाहन केले.
राज्याच्या अकरा कोटी जनतेपैकी साडेचार कोटी जनतेला संरक्षण नाही. शासनाच्या सेस फंडाकडे जमा होणारी एक टक्का वर्गणी हि या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून श्रमजीवी घटकाला वितरीत करताना मला या श्रमसाफल्याचा आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
माझे आणि के.पीं.चे नाते जिवाभावाचे मंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या राजकारणाचा संदर्भ घेत विविध सहकारी शिखर संस्थावर उल्लेखनीय यश संपादन केले.या यशामागे के.पी.पाटील यांचे योगदान,सहकार्य मोलाचे ठरले.आमच्या जिवाभावाच्या नात्यात कधीही अंतर आले नाही.हा भावाभावासम नात्याचा गोडवा अतुट रहाणार असल्याची भावना व्यक्त करताच उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटासह एकच दाद मिळाली.
माजी.आम.के.पी.पाटील म्हणाले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी.आम.के.पी.पाटील म्हणाले,मंत्री मुश्रीफ यांनी बांधकाम क्षेत्रातील दुर्बल घटक कामगार ओळखून त्याच्या आयुष्यात विविध योजनांचा लाभ देणारे मुश्रीफ हे राज्यात एकमेव मंत्री आहेत. यावेळी त्यांनी साखर कारखानदारीतील ऊसतोड करणारा कामगार, सुतगिरणीतील कामगार, ट्रक व अन्य वाहन व्यवसायातील घटकांसाठी अशा प्रकारची योजना अमलात आणावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वेळी प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव ,बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविणसिंह पाटील, मधू आप्पा देसाई ,धनाजी देसाई ,राजेंद्र पाटील ,अशोक कांबळे, उमेश भोईटे, ,श्रीपतराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, के.ना.पाटील, प्रविण भोसले, विकास पाटील, विश्वनाथ कुंभार, पंडितराव केणे, शामराव देसाई,आर.व्ही.देसाई आदिसह तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन पी.जी.पाटील यांनी केले.तर आभार सुनिल कांबळे यांनी मानले.