मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठ शिवप्रेमी तर्फे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यानां शंभर व्या स्मृतिदिनानिमित्य विनंम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम श्रीमती शितल सुभाष धुमाळ यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बरोबर दहा वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजानां मानवंदना दिली.
यावेळी शिवभक्त श्री. धोंडीराम परीट ( जय महाराष्ट्र ) यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी रयतेसाठी , समाजासाठी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्याआठवणींना उजाळा दिला.

या अभिवादन प्रसंगी सौ . मंगल आनंदराव गोरूले , सौ . उज्वला सुरेश गिरी, सौ . स्नेहल आषिश मोर्चे, श्रीमती कासूबाई संभाजी चित्रकार, सौ . लक्ष्मी शिवाजी चित्रकार , कु . कार्तिशा अमर गिरी , मधुकर मंडलिक ( गुरुजी ) , उद्धव मिरजकर , आशिष मोर्चे , शशी दरेकर ( पत्रकार ) सुरेश गिरी , प्रविण रणवरे , व शिवप्रेमी उपस्थित होते .
[…] मुरगुड (शशी दरेकर) : मुरगुड ता.कागल येथील निढोरी पुलाजवळील स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आल्याने येथील स्मशान भूमीस मरणकळा असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मुळात नाका नंबर एक पासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेले ही स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. शेडच्या वरील लोखंडी पाईप गंजल्याने त्या केव्हाही वरच्या पत्र्यासह तुटून पडण्याची शक्यता आहे. वरचे पत्रेही खराब झालेले आहेत दोन लोखंडी बेडची जागा उपलब्ध असताना पालिकेने केवळ एकाच बेडची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हा बेड ही पूर्णता खराब झालेला आहे. […]