‘अन्नपूर्णा’ चा विना कपात एकरकमी रू ४००२/- दर – संजयबाबा घाटगे

केनवडे : अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे (ता. कागल)या कारखान्याने २०२६/२०२७ या चालू गळीत हंगामातील उसाचा एकरकमी विना कपात प्रति टन ४००२/रुपये दर देण्याचा निर्णय केनवडे ता. कागल येथे संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संस्थापक संजयबाबा घाटगे यांनी दिली. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून परवडत नसताना देखील हा दर देत असल्याचे स्पष्ट करून घाटगे पुढे म्हणाले,

Advertisements

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास आणि त्यांच्या अपेक्षांचा विचार करून अन्नपूर्णा शुगरने विनाकपात ४००२ रुपये दर जाहीर केला आहे. शेतकरी हा साखर उद्योगाचा केंद्रबिंदू असून त्याचे आर्थिक हित जपणे ही आमची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

Advertisements

उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अंबरिषसिंह घाटगे यांनी केले. यावेळी संचालक दिनकर दौलू पाटील, दत्तोपंत वालावलकर, एम.बी.पाटील, राजेश भराडे, तानाजी पाटील, मल्हारी पाटील, के.के.पाटील, विश्वास दिंडोर्ले,उपस्थित होते.

नियमात न बसता देखील
अन्नपूर्णा शुगर हा खांडसरी प्रकल्प असल्यामुळे साखर कारखान्यांचे नियम या कारखान्याला लागू होत नाहीत शिवाय हा कारखाना कोणतेही उपपदार्थ बनवत नाही सह प्रकल्प नाहीत तरी देखील या कारखान्याने 4002 रुपये दर जाहीर केल्यामुळे उत्पादक व परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!