मुरगूड नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय: कायम ५० कर्मचाऱ्यांना तब्बल २० हजार रुपयांचा बोनस – नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील

मुरगूड च्या नगराध्यक्ष सौ. सुहासिनीदेवी पाटील यांच्या कडून पहिल्याच वर्षी दिवाळी ठरली अधिक गोड

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील,उपनगराध्यक्षा श्रीमंती रेखाताई आनंदा मांगले तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या कायमस्वरूपी ५० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये बोनस देण्याचा अत्यंत धोरणात्मक व महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

नगराध्यक्षांच्या सत्तेच्या पहिल्याच वर्षी मिळालेल्या या भरीव बोनसमुळे सर्व कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदात आणि गोड साजरी होणार आहे.

नगरपरिषदेच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतका मोठा बोनस देण्यात आला नव्हता. कर्मचाऱ्यांच्या हिताचा हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल ‘कामगार युनियन’ आणि नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील यांचा सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

Advertisements

कर्मचाऱ्यांच्या भावना: सत्कारप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “नगरपरिषदेत यापूर्वी कधीही इतका वाढीव बोनस मिळाला नव्हता.परंतु, नगराध्यक्षा
सौ.सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील यांनी पहिल्याच वर्षी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तब्बल २०,००० रुपये बोनस दिला.

नगराध्यक्षा या कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या खऱ्या पाठिराख्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे आमची दिवाळी अत्यंत आनंदात जाणार असून येणाऱ्या काळातही नगरपरिषद प्रशासन अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.

“कर्मचारी हा मुरगूडच्या स्वच्छतेचा खरा कणा” –
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील म्हणाल्या, “मुरगूड शहराचे सौंदर्य आणि स्वच्छतेचा खरा कणा म्हणजे नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत. आज आपले मुरगूड शहर जे देशात स्वच्छ व सुंदर दिसत आहे, ते केवळ या कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच. सण-उत्सवाच्या काळात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी आनंदात आणि गोड व्हावी, याच भूमिकेतून आम्ही भरीव बोनस देण्याचा निर्णय सर्वांच्या सहकार्याने घेतला आहे. इथून पुढेही कर्मचाऱ्यांच्या हिताबाबत नगरपरिषद प्रशासन कायम सकारात्मक निर्णय घेईल.” तसेच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सत्कारप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष जयवंत गोधडे, संतोष कुंभार, रणजित निंबाळकर, तानाजी कांबळे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ‘शिवाय उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, मुख्याधिकारी अतिश वळुंज ,पक्ष प्रतोद सुहास खराडे ,एस व्ही चौगुले ,सत्यजितसिंह पाटील दत्तात्रय मंडलिक , रंजीत भारमल, अनिल राऊत ,सम्राट मसवेकर, विजय मेंडके, सुनील रणवरे, गीतांजली अंगज ,सुजाता पुजारी , वैशाली गोधडे, विजया शिंदे, निकेलीन फर्नांडिस ,सध्या पाटील . सुरेखा लोकरे, संजिवनी कांबळे  तसेच सर्व नगरसेविका नगरसेवक यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

error: Content is protected !!