जिओचा सर्वात मोठा आयपीओ, शेअर किंमत १,०६५ ते १,११९ रु.
३०,२९३ कोटी रुपये उभाण्याचे कंपनीचे लक्ष्य

मुंबई :रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचय आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री निर्गम (आयपीओ) २१ ऑक्टोबरला खुला होणार आहे.

Advertisements

प्रति समभाग १,०६५ ते १,११९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून, कंपनीची सुमारे ३०,२९३ कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. हा आयपीओ यशस्वी झाल्यास तो भारतीय भांडवली बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. 

Advertisements

महत्त्वाच्या तारखा आणि तपशील:

आयपीओ उघडण्याची तारीख: २१ ऑक्टोबर 
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ ऑक्टोबरपर्यंत 
मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया: १९ ऑक्टोबर 
किंमतपट्ट्यास मंजुरी: समितीने बुधवारी किंमतपट्ट्याला मंजुरी दिली असून एकूण २७ कोटी समभाग जारी केले जाणार आहेत. 

गुंतवणूकदारांसाठी नियम व सवलत:

गुंतवणूकदारांना किमान १२ समभागांसाठी अर्ज करावा लागेल, त्यानंतर १२ समभागांच्या पटीत अर्ज करता येईल. 
पात्र कर्मचाऱ्यांना राखीव समभागांसाठी अर्ज करताना प्रति समभाग ५४ रुपयांची सवलत मिळणार आहे. 

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!