मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे सर्वसामान्यांचे आधारवड, हरितक्रांतीचे प्रणेने, बहुजनांचे कैवारी मा. खा. स्व. सदाशिवराव मंडलिकसाहेब यानां ९२ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथम मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन सौ. शुभांगी किरण गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अमर रहे अमर रहे मंडलिक साहेब अमर रहे च्या घोषणानीं परिसर दणाणून गेला.

यावेळी प्रथम महिला नगराध्यक्षाचा मान मिळविलेल्या माजी नगराध्यक्षा शुभांगी गवाणकर म्हणाल्या माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक साहेबानी आपल्या हयातीत आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब शेतकरी आणि कष्टकऱ्याचा कल्याणासाठी समर्पित केले .केवळ जनसामान्यांच्या पाठबळावर त्यानीं राजकारणात आणि समाजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले हे साहेब प्रेमी व गोरगरीब कदापी विसरणार नाहीत.
यावेळी शिवभक्त धोंडिराम परीट , माजी नगरसेवक राहुल शिंदे, पत्रकार प्रविण सुर्यवंशी , दिपक शिंदे यानीं मंडलिक साहेबांचा जीवनप्रवास उलगडत मनोगत व्यक्त केली.
मंडलिक साहेबांच्या ९२ व्या जयंती कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक किरण गवाणकर , निवास कदम , मधूकर मंडलिक ( गुरुजी ) , मिलिंद कासार , साहेब आत्तार , गौरव मोर्चे , विलास सुर्यवंशी , धनाजी जाधव , मधुकर मसवेकर , अमित दरेकर , सनी गवाणकर , आनंदराव गोरूले यांच्यासह मंडलिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .