गणेश विसर्जनाच्या दिवशी टोमॅटोमध्ये दिसले गणरायाचे रूप

पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

मुरगूड ( शशी दरेकर ) : गणेश विसर्जनाच्या दिवशी सूर्यवंशी कॉलनी मुरगूड येथील सूरज उर्फ बंटी गवाणकर यांच्या परसबागेतील टोमॅटोमध्ये चक्क गणरायाचे रूप दिसून आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisements

    आज सकाळी नेहमीप्रमाणे सूरज गवाणकर हे परसबागेतील भाजीपाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना टोमॅटोच्या फळावर गणरायाच्या मुखासारखी आकृती दिसून आली. गणेशोत्सवाच्या काळात आणि विशेषतः गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशीच हा अनोखे गणरायाच्या मुखाचे दर्शन दिसून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

Advertisements

    ही बातमी परिसरात पसरताच टोमॅटोमध्ये दिसणारे गणरायाचे रूप पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी गवाणकर यांच्या परसबागेकडे गर्दी केली. अनेकांनी या अनोख्या टोमॅटोचे दर्शन घेत फोटो आणि व्हिडिओही काढले.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी टोमॅटोमध्ये गणरायाचे रूप दिसल्याने हा योगायोग की निसर्गाचा अनोखा आविष्कार, याचीच चर्चा सध्या मुरगूडमध्ये रंगली आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!