शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : शाहू हायस्कूल कागल ( ता- कागल ) येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची मिणचे ( पेठवडगांव ) येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या विजयी संघातील खेळाडूंना शाळेच्या वतीने गौरवण्यात आले .

Advertisements

         शाहू हायस्कूल कागल येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात रुपेश उपाडे , विराट पाटील  याच्या उत्कृष्ठ पासवर व
संस्कार हासबे ( कप्तान ) , वीरधवल चौगले , श्रेयस भारमल , अथर्व  मेटकर, साई भराडे यांच्या जोरदार स्मॅशच्या जोरावर एम आर पाटील हायस्कूल बाचणी संघाचा २५ – ८ , २५ – १२ असा लिलया पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात इनोव्हेटीव्ह पब्लिक स्कूल बोरवडे संघाचा २५ – ८ , २५ – ८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला . उंपात्य सामन्यात एम डी हायस्कूल अर्जूननगर संघावर २५ – ८ , २५ – ८ असा विजय मिळविला.

Advertisements

            संघातील खेळाडू असे :संस्कार हासबे ( कप्तान ) , वीरधवल चौगले , श्रेयस भारमल , अथर्व  मेटकर, विराट पाटील ,साई भराडे, रुपेश उपाडे ,पियुष घोटणे ,  विनीत परीट ,तन्मय खैरे , विश्वजीत कांबळे , समर्थ डवरी यांचा समावेश आहे.

            या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक , माजी प्राचार्य महादेव कानकेकर , क्रीडा शिक्षक रणजीत चव्हाण , प्रशिक्षक संभाजी मांगले , अजित गोधडे , विनोद रणवरे ,सुहास भारमल , अमित साळोखे, करण मांगले, श्रावण कळांद्रे, गजानन गोधडे, मितेश सावंत , विवेक चौगले यांचे मार्गदर्शन लाभले . तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक , अध्यक्ष गजाननराव गंगापुरे , कार्यवाह आण्णासो थोरवत , प्राचार्य व्ही बी खंदारे , उपमुख्याध्यापक सुनील पोवार , उपप्राचार्य इ व्ही चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!