मुरगूडमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील विठ्ठल मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संत सेना महाराजांची पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अमोल रणवरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर ह भ प उपलाने महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

Advertisements

   यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांचे हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला.हा कार्यक्रम नगरसेविका गीता आंगज, नकेलीन बारदेस्कर,माजी नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी, नगरसेवक सुनील रनवरे, विजय मेंडके,वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी,नाभिक संघटना कागल तालुका अध्यक्ष दिग्विजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

    यावेळी नाभिक संघटना मुरगूड शहर अध्यक्ष सचिन रणवरे, प्रविण रणवरे, उपाध्यक्ष नितीन माने, संभाजी माने, सचिन रणवरे,विलास रणवरे, संदीप रणवरे, संजय रणवरे,रामचंद्र वाडेकर, जोतीराम रणवरे, बाळासो वाडेकर,नंदू रणवरे, दीपक वाडेकर, बंडा कमळकर, गुरु माने, भगवान माने, गुंडा माने, प्रसाद कमळकर,  आदिंसह मुरगूड मधील समाज बांधव, नागरिक व वारकरी भाविकभक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!