मुरगूड मधील शिष्यवृत्ती व बांधकाम कामगारांना महाडिक यांच्या हस्ते चेक वितरण
मुरगूड ( शशी दरेकर ) :भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडिक यांचे मुरगूड नगरीत आगमन झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी युवा नेते दिग्विजयसिंह पाटील यांनी मा. कृष्णराज महाडिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक मा, सम्राट मसवेसकर यांनी केले.
यावेळी युवा नेते दिग्विजयसिंह पाटील म्हणाले युवा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज यांनी नुकताच काल मुंबईमध्ये धडक मोर्चा काढला. आज तागायत मनसे किंवा शिवसेनेवर धडक मोर्चा कधी निघाला नाही परंतु या कोल्हापूरच्या युवा नेत्यांने मुंबईमध्ये जाऊन धडक मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला .याबद्दल त्यांचा आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो.
कृष्णराज महाडिक मनोगत व्यक्त करताना म्हणाले मुरगूडच्या पाटील घराण्यांचे व आमचे पन्नास वर्षांपूर्वीपासून संबंध आहे ते तसेच राहावे आताची आमची तिसरी पिढी एकमेकाच्या हातात हात घालून काम करू आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी मी मुंबईमध्ये मंत्रालयात असतो . आमच्याकडे कोणतेही काम घेऊन या आम्ही मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांना भेटून आपल्या कामांची पूर्तता करू असे आव्हान महाडिक यांनी केले.
नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी चालू आहे आणि त्यातच माझ नांव कृष्ण आहे आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच मला येथील श्रीकृष्णाचे दर्शन मिळाले हे माझं भाग्य समजतो.
यावेळी पाणीपुरवठा समितीचे सभापती सत्यजीतसिंह पाटील कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रविश पाटील,तालुका अध्यक्ष अॅड अमर पाटील, एकनाथ पाटील नगरसेवक रणजित भारमल मुरगूड सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन वसंतराव शिंदे , शिवाजीराव सातवेकर, राजेंद्र चव्हाण, संजय मोरबाळे ,एम बी मेडके नगरसेवक विजय मेंडके, विश्वासराव चौगुले तसेच मुरगूड परिसरातून संरपच पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी चे कोल्हापूर जिल्हा सह संयोजन भोला लोहार यांनी तर आभार डॉ.सुशांत मगदूम यांनी मानले.