आडी येथील संजीवनगिरीवर पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी

श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात

कागल (प्रतिनिधी) : आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरी वरीलश्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरत असते .आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हजारो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी  केली होती .

Advertisements

           भाविकांच्या अलोट गर्दीत, हर हर महादेवाच्या गजरात,भक्तिमय वातावरणात श्रावण पहिला सोमवारची यात्रा मोठा उत्साहात संपन्न झाली.

Advertisements

            यावेळी पहाटे पाच वाजता शोडषोपचार  विधिवत शिवलिंगाची पूजा, व महाअभिषेक करून  आणि सहस्त्र नामावली सह 11000 बेल ,फुले अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यातआली.बेल फुले अर्पण करण्यासाठी भाविकांना पांढरी वस्त्रे परिधान करून, सोहळ्याने मलिकार्जुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.

या संधीचा लाभ घेऊन हजारो भाविकांनी शिवलिंगावर बेल फुले व अक्षता अर्पण केले. तसेच श्री भ्रमरांबिका देवी मंदिरामध्ये सुद्धा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली . 

Advertisements

            यावेळी श्री दत्त मंदिरामध्ये ही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती .अभिषेक प्रसादाचा,तसेच भगर प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी दुपारी आणि गावातून डोंगरावरती श्री मल्लिकार्जुन पालखीचे आगमन झाले.मंदिरा भोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी खारीक खोबरे,तसेच नगारखान्यावर नारळ फेकून वाढवण्याची परंपरा भाविकांनी जोपासली.हजारो भाविकांनी हर हर महादेव !असा घोष करत श्री शिवशंभोचे रांगेत राहून दर्शन घेतले .सायंकाळी सात वाजता श्री मल्लिकार्जुन पालखीचे आणि गावात आगमन झाले.

यावेळी महिला भाविकांनी पाण्याच्या घागरी अर्पण करून स्वागत केले .तसेच श्री महादेवाचे दर्शन घेतले .यावेळी गावच्या मध्यस्थानी मलिकार्जुन चौकात हालगीच्या तालावर पारंपारिक पद्धतीने सासनकाठ्या नाचविण्यात आल्या . देवस्थान कमिटीच्या आणि निपाणी   पोलीस ठाण्याच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!