भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील महालक्ष्मी सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. इंजूबाई मंदिर हॉल गारगोटी येथे नुकत्याच पार पडलेल्या भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मेळाव्याप्रसंगी त्यांची माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, युवानेते व गोकुळचे विद्यमान संचालक रणजीतसिंह के. पाटील, यांच्या हस्ते त्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे के. पी . पाटील, पंडितराव केणे, जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील, विश्वनाथ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असून निवड सार्थ ठरविणार असल्याचे त्यानी गहिनीनाथ समाचारशी बोलतानां सांगितले शिंदे हे गेली वीस वर्ष आपल्या महालक्ष्मी सहकार समूहाच्या माध्यमातून माजी आमदार के. पी. पाटील व रणजीतसिंह के. पाटील यांच्यासोबत तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात सक्रिय असतात शिंदे यांच्या निवडीने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

Advertisements


यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसो आरडे , बिद्रीचे संचालक. अशोकराव कांबळे ,अनिल साळुंखे, विश्वनाथ कुंभार, सुनील कांबळे, बाळ काका देसाई, मधु आप्पा देसाई, धनाजीराव देसाई, यांच्यासह तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!