मुरगूड ( शशी दरेकर ) : संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा६७६ वा संजीवन समाधी सोहळा म्हणून मधे धार्मिक वातावरणात व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त मुरगूड मधील समस्त नामदेव शिंपी समाज,वारकरी संप्रदाय व भाविकांचच्या सहभागाने विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत दररोज सकाळी काकड आरती,हरिपाठ, किर्तन यांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये ह.भ.प.श्री. एकनाथ गुरव महाराज( मळगे ), ह.भ.प.श्री. डॉ.शिवाजीराव पन्हाळकर महाराज,(उत्तुर ), ह.भ.प.श्री. राहुल पाटील महाराज( कुरुकली), ह.भ.प.श्री. नारायण एकल महाराज,(जोगेवाडी) यांनी कीर्तन सेवा पुरविली. सोबत चोपदार रोहित कोळेकर महाराज, विणेकरी मारुती शेट्टी महाराज, मंदिर पुजारी तुकाराम वंडकर. यांची साथ लाभली.

यानंतर सोमवार दि. १०/८/२०२६ रोजी दिंडी काढण्यात आली तर ११ ऑगस्ट २०२६ रोजी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे किर्तन संपन्न झाले .यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले .
समाजाचे अध्यक्ष महादेव वंडकर, उपाध्यक्ष प्रमोद वंडकर. माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांनी सर्व भक्तांचे स्वागत केले .
या कार्यक्रमाचे आयोजन शुभम वंडकर ,योगेश वंडकर , समाधान हावळ, सौरभ वंडकर, ओंकार वंडकर. ओंकार क्षीरसागर, स्वप्निल वंडकर , प्रशांत वडकर, विजय हावळ, उध्दव मिरजकर ,प्रणव मिरजकर, नामदेव शिंपी समाज बांधव व भक्त मंडळी यांनी केले होते.