मासेमारीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू

कागल (प्रतिनिधी) : मासेमारीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा ओढ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रितम धोंडीराम चव्हाण (वय २२, रा. कागल) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास श्री साई मंदिराशेजारील ओढ्यात ही दुर्घटना घडली. प्रितम मासेमारीसाठी गेला असता अचानक ओढ्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

Advertisements

या घटनेची माहिती परिसरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कायदेशीर कार्यवाही व तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!