मुरगूड ( शशी दरेकर ) : थोर शास्त्रज्ञ , सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व त्यांच्या सहकार्यानीं पेपरफुटी व इतर समस्यांच्या संदर्भात दिल्ली येथे सुरु केलेल्या ” जंतर – मंतर” मैदानावरील आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक बी .डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी मा . गजानन गुरव साहेब यानां या आंदोलनाच्या पाठिंब्याचे निवेदन दिले.
Advertisements
नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमिवर प्रातनिधिक स्वरूपात हे निवेदन दिल्याबद्दल गुरव साहेबानीं समाधान व्यक्त केले.
Advertisements

यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी .एस. खामकर , सचिव सुरेश खोत , विलास साठे , जयशिंग देवकर , कॉ चव्हाण सर , चोपडे सर , संजय चोरमारे , बी .बी. चिंदगे उपस्थित होते .