जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली दूधगंगा 6.28 टीएमसी वारणा 17.88 टीएमसी राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील दूधगंगा 6.28 टीएमसी, वारणा 17.88 टीएमसी, राधानगरी धरणात 4.60 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

Advertisements

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड, आरे व बाचणी,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, सांगरुळ, धामणी नदीवरील- सुळे,  वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, कडवी नदीवरील-कोपार्डे, सवतेसावर्डे, सरुडपाटणे व शिरगाव, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, शाळी नदवरील- येळाणे, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐनापूर व हरळी, घटप्रभा नदीवरील- कानडी सावर्डे, हिंडगाव, पिळणी, भोगोली, अडकूर व तारेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, कोतेवाडी, हल्लारवाडी व कोवाड असे एकूण 60 बंधारे पाण्याखाली आहे.

Advertisements

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4.60 टीएमसी, तुळशी 1.82 टीएमसी, वारणा 17.88 टीएमसी, दूधगंगा 6.28 टीएमसी, कासारी 1.31 टीएमसी, कडवी 1.23 टीएमसी, कुंभी 1.28 टीएमसी, पाटगाव 1.66 टीएमसी, चिकोत्रा 0.56 टीएमसी, चित्री 0.89 टीएमसी, जंगमहट्टी 0.70 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.77 टीएमसी, आंबेआहोळ 0.88 टीएमसी, सर्फनाला 0.55 टीएमसी, धामणी 1.29 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.5 फूट, सुर्वे 34.10 फूट, रुई 64.9 फूट, इचलकरंजी 61 फूट, तेरवाड 54.4 फूट, शिरोळ 48.6 फूट, नृसिंहवाडी 47 फूट, राजापूर 36.8 फूट तर नजीकच्या सांगली  23.9 फूट व अंकली 27.8 फूट अशी आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!