कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यात पावसाचा जोर वाढला. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. दूधगंगा नदी पात्रात पाणी झपाट्याने वाढत आहे.
गेली दोन दिवस झाले, पावसाची रिपरिप वाढली आहे.तळी भरली आहेत. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. शेतीची कामे खोळबली होती.पावसाची सुरुवात जोमदार झाल्याने पेरण्या झालेल्या आहेत. आगाऊ पेरणी झालेली पिके वाढीस लागली आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

सततच्या पावसाच्या रिपरिपीने नदी-नाल्यातील पाण्याचा प्रवाह गतीने वाढतोय. दुथडी भरून वाहत आहेत. नदीतील पाणी पातळी झपाट्याने वाढते आहे. पावसाचा जोर असला तरी शेती-शिवरात पाण्याची जिरवणी सुरु आहे. रानातून अद्याप पाणी बाहेर पडलेले नाही. दीकाठच्या पाण्याच्या मोटारी काढणेत शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पावसा जोर असाच राहिल्यास तालुक्यातील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.