मुरगूड – निपाणी रस्त्यावर  खडकेवाडा  जवळ भीषण अपघातात दोन ठार, दोन जखमी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड -निपाणी रस्त्यावर  खडकेवाडा (तालुका कागल ) पुलावर भरधाव मोटारकारने पती पत्नीला उडवले . यात पती बाळासो तासिलदार ( वय ६५  रा खडकेवाडा ता.कागल  )व गाडीचालक वासीम मोहम्मद सोलापूरे ( वय ४५ रा निपाणी ) हे दोघे जागीच ठार झाले तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला अपघाताची नोंद मुरगूड पोलीसात  झाली आहे .

Advertisements

  या बाबतची  अधिक माहिती अशी : मंगळवारी रात्री खडकेवाडा (ता. कागल) येथील दाम्पत्य बाळासो बाबालाल तासिलदार वय ६५) व सुगराबी बाळासो  तासिलादार (वय ५८) हे दोघे रात्री घरातील मोहरमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशीरा गलगले रस्त्यावरील आपल्या शेतातील घराकडे झोपण्यासाठी जात होते.

Advertisements

दरम्यान मुरगूड निपाणी मार्गावर खडकेवाडा पुलावरून निपाणीकडे जाणाऱ्या हुंडाई आय २० ( एमएच ०३ ) या भरधाव कारने या दाम्पत्यास पाठीमागून जोराची धडक दिली यात बाळासो हे २० फूटावर जावून पडल्याने ते गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले तर गाडी पल्टी होत झाडाला जावून धडकली यात कार चालक वासीम मोहम्मद सोलापूरे (वय ४५ रा निपाणी ) हे जागीच ठार झाले.

      या अपघातातील सुगराबी बाळू तासिलदार वय ५८ रा. खडकेवाडा) व गाडीतील स्वार अमिर आजम गवंडी (वय ४० रा. निपाणी) असे दोघेजण जखमी झाले. या जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Advertisements

       अपघातस्थळावरील दृश्य अंगावर शहारे आणणारे होते . बाळासो तासिलदार यांचा एक हात व एक पाय धडापासून दहा ते बारा फूटाच्या अंतरावर पडले होते . तर जागेवर रक्ताचा सडा पडला होता . भरधाव कारवरील बेधुंद चालकाचा ताबा सुटल्यानेच हा थरारक अपघात झाला.

या अपघाताची माहिती पोलीस पाटील आप्पा पवार यांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत अम्ब्युलन्स बोलवून जखमींना उपचारार्थ हलवले व मुरगूड पोलीसांना अपघाताची माहिती दिली .  मुरगूड पोलीसात अपघाताची नोंद  झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!