मुरगूड ( शशी दरेकर ) :
अमृताहून मधुर असा जिचा गौरव संत ज्ञानेश्वर माऊलींनी केला; जी आमुची मायबोली आहे; जिच्या संगतीने दऱ्या खोऱ्यातील शिळांना जाग येते अशा भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मराठी भाषा अद्याप ही अभिजात दर्जाच्या प्रतिक्षेत आहे. या भाषेला हा दर्जा प्रदान करुन ती ज्ञान भाषा व्हावी. असे मत मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य एस. पी. पाटील यांनी व्यक्त केले.
ते मुरगूड येथील बसस्थानकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ” मराठी राज्य भाषा दिन “कार्यक्रम प्रसंगी बोलत होते . अध्यक्षस्थानी शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य रविंद्र शिंदे होते. कार्यमात प्रारंभी वि. वि. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचे मराठी भाषेची थोरवी गाणारे भाषण झाले.
यावेळी डॉ.बी.एन..डवरी, प्रकाश तिराळे, राजु चव्हाण, वाहतुक अधिकारी प्रसाद पाटील, वाहतूक नियंत्रक लोकरे, सागर, प्रा. टेबुगडे, आदि मान्यवर प्रवाशी उपस्थित होते.