विद्या मंदिर सोनगेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सोनगे ता कागल येथिल विद्यामंदिर शाळेमध्ये भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Advertisements

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनेक पैलू सांगत यावेळी  विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे तसेच टपाल तिकिटे, बाबासाहेबांचे दुर्मिळ ग्रंथ तसेच फोटो यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Advertisements

प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण सहाय्यक संचालक आदरणीय डॉ जी .बी. कमळकर साहेब व शिव शस्त्रागार संग्रहाचे संग्राहक व इतिहास संशोधक मा. अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच संजय कळंत्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना पाटील व  इतर सदस्य तसेच शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर जांभळे यांनी केले. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगून डॉ. कमळकर साहेब यांनी  समाजात बांधिलकी जपावी असे आवाहन  केले.

आभार व सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले. यावेळी रवींद्र केरबा कांबळे, अमृता देवडकर, कल्याणी कांबळे तसेच शिक्षक श्री संजय प्रधान सर तेजस्विनी पाटील, सुप्रिया पाटील उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!