मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेला २ कोटी २९ लाख निव्वळ नफा – चेअरमन सोमनाथ यरनाळकर

एकूण व्यवसाय ६६३ कोटीच्यावर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता कागल येथिल सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पत संस्थेला २०२५ / २६ या आर्थिक वर्षात २ कोटी २९ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर यानी दिली.

Advertisements

ते पुढे म्हणाले या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय ६६३ कोटी इतका केला आहे . सध्या मुख्य शाखेसह केनवडे , बिद्री , गारगोटी , नंदगांव येथे शाखा कार्यरत असून ठिकपूर्ली ता राधानगरी येथे शाखेसाठी मंजूरी मिळाल्याचे सांगितले.

Advertisements

स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने व मा . खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे . संस्था आधुनिकेतेचे पाऊल पुढे टाकतानां ग्राहकानां कोअर बँकींग सेवा उपलब्ध करुन देत RTGS, NEFT, IMPS QR CoDE यासारख्या सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत.

  संस्थेची सांप्पतिक स्थिती भक्कम असून ठेवी १३२ कोटी ७ लाख , वसूल भागभांडवल ४६ लाख ४० हजार , राखीव व इतर निधी १३ कोटी ४४ लाख , कर्जे १०४ कोटी ५१ लाख , पैकी सोनेतारण ४३कोटी ४२ लाख , गुंतवणूक ४७ कोटी २९ लाख , खेळते भांडवल १५५ कोटी ३१ लाख , डिव्हीडंट १५ टक्के ,ऑडीट वर्ग ” अ ” ( मार्च २०२५ ) मिळाला असुन संस्थेला विविध पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे त्यानीं यावेळी सांगितले.

संस्था विश्वासार्ह कारभार करत संपूर्ण संगणकीकृत जलद व तत्पर सेवा , आकर्षक ठेव योजना , लॉकर्सची सुविधा कर्तव्यदक्ष संचालक मंडळ , व सेवाभावी सेवक वर्ग यामुळे संस्था प्रगतीची गरूडझेप घेत आहे.

    संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत व्हा . चेअरमन राजाराम कुडवे , संचालक सर्वश्री उदयकुमार शहा , एकनाथ पोतदार , आनंदा देवळे , मारुती पाटील , सुखदेव येरुडकर, प्रकाश हावळ , आनंदा जालिमसर , दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . रूपाली शहा , सौ रेखा भोसले , कार्यकारी संचालक राहुल शिंदे , सेवक वृंद व सभासद , ठेवीदार , प्रामाणिक कर्जदारांचे बहुमोल असे सहकार्य लाभले असल्याचे त्यानीं सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!