दीनदलीत, सामान्य कष्टकरी, कार्यकर्त्यानां मंडलिक साहेबानी आधार दिला – गजानन गंगापूरे

मंडलिक साहेबांच्या स्मृतिदिनी जेष्ठ नागरीक संघातर्फे अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) :-  लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेबानी दीन दलीत, सामान्य कष्टकरी, कार्यकर्ते यानां आयुष्यभर प्रामाणिक राहुन व चूकीच्या गोष्टीना विरोध दर्शवित बांधिलकी जपत आधार दिला असे प्रतिपादन मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे यानीं व्यक्त केले.  

Advertisements

       स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्य मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisements

प्रथम जेष्ठ नागरीक व माजी सैनिक पांडूरंग मेंडके यांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडलिक साहेब अमर रहे ! मंडलिक साहेब झिंदाबाद अशा घोषणानीं परिसर दुमदुमून गेला.

यावेळी सदाशिव एकल यानी आपल्या बदली सदर्भात साहेबानी दिलेल्या योगदानाबद्दल व सावर्डेक बापूनी माळरानाची बागायत जमीन साहेबांच्या अथक प्रयत्नातून झाल्याने त्यांचे हे उपकार शेतकरी कदापिही विसरणार नाहीत असे सांगितले. यावेळी उपस्थितातून मंडलिक साहिबांच्या अनेक आठवणीनां उजाळा मिळाला.

   या आभिवादन प्रसंगी माजी प्राचार्य पी .डी. मगदूम, एम.टी सामंत, आनंदा चांदेकर, दादू बरकाळे, रामचंद्र रणवरे, सिकंदर जमादार ( पापा ), संघाचे सदस्य यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत जयवंत हावळ  यानीं केले तर आभार सामंत सरानीं मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!