आदित्य सावर्डेकरच्या संतर्कतेमुळे जखमी कोकिळा पक्षास पक्षीमित्रांकडून जीवदान.

मुरगूड ( शशी दरेकर ):-

येथील स्व. विजयमाला सदाशिवराव मंडलिक उद्यानामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या आदित्य सावर्डेकर या विद्यार्थ्यास जखमी अवस्थेमध्ये असलेल्या कोकिळा जातीच्या पक्षास  कांहीं कावळे टोचून घायाळ करत होते हे दिसून येताच त्याने कावळ्यांच्या तावडीतून सदर कोकिळेस सोडविले आणि आपला मित्र अक्षय मसवेकर याच्या मदतीने त्या कोकिळेस पक्षीमित्र, वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचेकडे सुपूर्द केले. पक्षीमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी त्या कोकिळेवर प्रथमोपचार करून, वन खात्याशी संपर्क साधला व सदर पक्षास  वनरक्षक राहुल झोनवाल यांच्याकडे सुखरूपपणे सुपूर्द केले.

  एका पक्षीप्रेमी विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे व पक्षीमित्र शिक्षकाच्या दक्षतेमुळे या जखमी अवस्थेमधील कोकिळेस जीवदान मिळाले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!