मुरगूडमध्ये ‘स्वराज्य चषका’चा थरार, तहसीलदार आमरदिप वाकडे यांच्या फटकेबाजीने दुसऱ्या दिवसाचे दिमाखदार उद्घाटन

मुरगुड ( शशी दरेकर ) : येथील ऐतिहासिक भूमीत सुरू असलेल्या ‘स्वराज्य चषक स्पर्धा २०२६’ च्या दुसऱ्यादिवसाचे उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कागलचे तहसीलदार  अमरदीप वाकडे यांनी केवळ क्रिकेटचे उद्घाटनच केले नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून फलंदाजीचा आनंद लुटत उपस्थितांची मने जिंकली.

Advertisements

स्वागत नंदकुमार चौगले प्रस्ताविक सुशांत मागोरे  कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महादेव कानकेकर

Advertisements

   दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीनंतर तहसीलदार साहेबांनी हातात बॅट धरून समोरून येणाऱ्या चेंडूवर त्यांनी लगावलेला खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह पाहून मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. यातून प्रशासकीय बॅटिंगचा जलवा पहावयास मिळाला. प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत साहेबांनी दाखवलेली ही खिलाडूवृत्ती तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.

       मुरगूड नगरीत क्रिकेटचे वेड मोठे आहे. ‘स्वराज्य चषक २०२६’ च्या निमित्ताने स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. आजच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार साहेबांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की,

“खेळ हा केवळ विजय मिळवण्यासाठी नसून तो शिस्त आणि संघभावना शिकवण्यासाठी असतो. स्वराज्य चषकासारख्या स्पर्धांमधून मुरगूडच्या मातीतील हिरे नक्कीच चमकतील.”

या कार्यक्रमाला मुरगूडचे स्थानिक पदाधिकारी, मुरगूड पत्रकार संघाचे सर्व पत्रकार, क्रीडा प्रेमी आणि स्वराज्य चषक समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार साहेबांच्या हस्ते खेळवल्या गेलेल्या या ‘प्रातिनिधिक ओव्हर’ने मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे. सुत्रसंचालन बाळू मनेर यांनी तर आभार सत्यजित चौगले यांनी मानले

Leave a Comment

error: Content is protected !!