मुरगूड ( शशी दरेकर ):
मुरगूड ता. कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडले.
गुरुवार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात सकाळी ठिक१० वाजता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक मा.श्री. विजय सापळे यांच्या शुभहस्ते व आनंदराव कल्याणकर (सर), सौ.विद्या पॅलीस फर्नांडिस (उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या मालवण शहर) यांच्या प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला. शिवभक्त धोंडीराम परीट यानीं शिव प्रार्थना सादर करत असतानां उपस्थितानी त्यानां साथ दिली. त्यानंतर भारतीय शहिद जवान व स्वर्गवासी झालेले शिक्षक यानां श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी सौ.विद्या फर्नांडिस यानां शिवभक्त धोंडीराम परीट यांचेकडून छ. शिवाजी महाराजांचे पुस्तक भेट देण्यात आली.
त्यानंतर “छ. शिवरायांचे आज्ञा पत्र” हा विषय घेऊन विनय कुलकर्णी ( सर ) यांचे व्याख्यान शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडले.
यानंतर सौ. समिरा जमादार, सौ. माया मोरबाळे, सौ.रंजना देवळे, सौ. विजयमाला शिंदे (नगरसेविका), सौ. वैशाली गोधडे (नगरसेविका), श्री . शंकर कांबळे, आकाश दरेकर ( इंजिनियर ), गौरव मोर्चे, यानी छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आठवणी सांगून मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यपदी निवड झालेबद्धल मारूती उर्फ बटू जाधव तसेच पहिली ते दहावी पर्यंतचे मोफत क्लास घेत असलेले रविंद्रकुमार जालीमसर यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करणेत आला.
यावेळी सेवानिवृत्त ४२ शिक्षकांचा पुष्पगुच्छ व छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या शिवजयंती कार्यक्रमास उद्योगपती प्रविण दाभोळे, अमर देवळे, श्री व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, नगरसेवक शिवाजी चौगले, राहुल शिंदे, सुनिल रणवरे, संदिप कांबळे, शशिकांत दरेकर, उध्दव मिरजकर, अमित दरेकर, लालू चित्रकार, अमर कापशे, ओंकार दरेकर, बंटी गवाणकर, गणेश कुडवे यांच्यासह महिला, शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वागत व सूत्रसंचालन विनय कुलकर्णी प्रास्ताविक विकी साळोखे यानी तर आभार शिवभक्त धोंडीराम परीट यानी मानले.
मुरगूड येथे छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य शिवप्रेमीतर्फे विविध कार्यक्रम उत्साहात
Advertisements
AD1