कोजिमाशिचे चेअरमन “अविनाश चौगले” यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर )

     मुरगूड ता. कागल येथिल शिवराज विद्यालय व ज्यूनि. कॉलेजमध्ये कार्यरत असलेले अविनाश महादेव चौगले यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनविरोध निवड झालेबद्दल मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यानीं त्यांचा शिवराज विद्यालय येथे यथोचित सत्कार करण्यात आला.

      यावेळी सत्काराला उत्तर देतानां चौगले म्हणाले सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन आणि सर्वानां विश्वासात घेऊन स्वच्छ व पारदर्शी कारभार करणार असलेचे सांगितले.

    या सत्कार प्रसंगी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, संचालक शशिकांत दरेकर, संदिप कांबळे संस्थेचे इतर पदाधिकारी, सुंदर्शन हुंडेकर, यांच्यासह एकनाथ आरडे ( सर ) व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!