शिंदेवाडी ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता . कागल येथिल ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचारी ” अक्षय कांबळे ” यानां सायकल प्रदान करण्यात आली. अक्षय कांबळे हा दौलतवाडी येथिल रहिवाशी असून तो शिंदेवाडी ग्रामपंचायत येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

Advertisements

परिस्थिती हलाखिची असल्याने तो भल्या पहाटे साडेसहा वाजता नियमित शिंदेवाडी गावची नियमित व प्रामाणिकर स्वच्छता करत आहे. त्यामुळे तटपुंज्या पगारावर कुंटूबाचा सर्व उरनिर्वाह करत असुन रोज येता -जाता सात किलोमिटरचा प्रवास पायपीट करून करत होता .. पण , त्याच्या परस्थितीची जाणीव पाहून शिंदेवाडी येथिल काही युवकानी सेवाभावी वृत्तीने त्याला मदतीचा हात दिला .

Advertisements

विजय कदम , अरूण मोरबाळे , विनायक खराडे , सचिन खराडे , राहुल खराडे , सुशांत शिंदे , दिपक शिंदे , विजय शिंदे , निवास शिंदे , संजय शिंदे , संदिप शिंदे , शिवाजी शिंदे , रामचंद्र गिरी ( डॉक्टर ) , दत्तात्रय गिरी , मयुर माळी , यानीं त्याचा सत्कार करून सायकलं प्रदान करण्यात आली .

   यावेळी अक्षय कांबळे आपले मनोगत व्यक्त करतानां म्हणाले मी भल्या पहाटे शिंदेवाडी येथील रस्ते, गटारी स्वच्छ ठेवून संर्वाच्या आरोग्यासाठी पर्यावर जपतो . अत्यंत प्रतिकुल परस्थितीत हातमोजे , मास्क शिवाय स्वच्छतेचे प्रामाणिक काम करत असतो . मला माझ्या आरोग्याच्या समस्यानां सामोरे जावे लागते . लोकाकडून कचरा डव्यात न टाकलेले दुःख आहे .स्वच्छ भारत हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे . तीच कामगिरी मी जबाबदारीने पार पाडत आहे.

    जेव्हा गांव झोपलेले असते, तेव्हा माझी कामाची दिनचर्या सुरु होते . आणि मनांत एकच ध्येय असते माझा गांव सुंदर आणि स्वच्छ ठेवणे हाच आहे. शेवटी माझ्या परस्थितीची जाणीव ठेऊन मला सायकल देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो.

Leave a Comment

error: Content is protected !!