मुरगूडच्या श्री.लक्ष्मी-नारायण पतसंस्थेचा संचालक, कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

संस्था प्रगतीची उंच भरारी घेण्यासाठी संचालक – कर्मचारी यांच्यातील विचारांची देवाण – घेवाण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकिक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचा सर्व संचालक मंडळ व आजी – माजी कर्मचाऱ्यांचा एकत्रित स्नेहमेळावा तळेमाऊली येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतानां सभापती किशोर पोतदार म्हणाले ३१ मार्च २०२६पर्यंत ठेवी १५१ कोटी,  कर्ज ११७ व नफा ३ कोटी १० लाख करण्याचे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेवले आहे. संचालक मंडळ व सर्वच कर्मचारी वर्गाने हे उदिष्ठ साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन करुन हे उदिष्ठ कोणत्या पध्दतीने पूर्ण करावयाचे याची सविस्तर चर्चा शाखाधिकारी व सर्व सेवक वृंदानां देण्यात आली. या बाबत कर्मचारी वर्गानेही आपले विचार व्यक्त केले.

Advertisements

      लक्ष्मी -नारायण पतसंस्था ही सुसज्य इमारतीत मुख्य कार्यालयासह सहा शाखा कार्यरत आहेत. प्रत्येक शाखेत सर्व व्यवहार संपूर्ण संगणकीकृत आहेत. अभ्यासू व कुशल संचालक मंडळ, कर्मचारी वर्गाकडून आदराने व सन्मानपूर्वक तत्पर सेवा, कर्जपुरवठा अशा अनेक कारणानी संस्था प्रगतीपथावर आहे.

Advertisements

      यावेळी जेष्ठ संचालक पुंडलिक डाफळे यानीही संस्थेची माहिती देऊन आपले विचार व्यक्त केले. तसेच जनरल मॅनेंजर नवनाथ डवरी यानी कर्मचाऱ्यानी विचारलेलया प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान केले.

Advertisements

         या स्नेहमेळाव्यास सभापती किशोर पोतदार, उपसभापती दत्तात्रय कांबळे, संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडिस, चंद्रकांत माळवदे, रविंद्र खराडे, विनय पोतदार, रविंद्र सणगर, सौ. सुजाता सुतार, सौ. सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी यांच्यासह सेवक वृंद, सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

स्वागत जवाहर शहा यानीं केले तर आभार विनय पोतदार यानीं मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!