मुरगूड ( शशी दरेकर )
१३/१२/१९४२ च्या गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन असल्याचे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
प्राचार्य होडगे पुढे म्हणाले की, आजच्या युवा पिढीला हा गारगोटीचा रणसंग्राम समजावा, त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहोचवा त्याचबरोबर या लढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाची आठवण सतत राहावी या उद्देशाने आजचा हा हुतात्मा दिन साजरा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हुतात्म्यांच्या स्मृती ज्योतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुशांत पाटील यांनी केले. ते म्हणाले की,१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मुरगूड व परिसरातील हु.तुकाराम भारमल, हु.शंकरराव इंगळे, हु.करवीरय्या स्वामी, हु.मल्लू चौगुले, हु.बळवंत जबडे, हु.परशुराम साळुंखे यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गारगोटी येथे सात पाकळ्यांचे भव्य स्मारक उभारलेले आहे. हे स्मारक आजही तरुण पिढीला नवीन स्फूर्ती देत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.डी.पी.साळुंखे, प्रा.अशोक पाटील, प्रा.बी.के.सारंग, प्रा. सुहास गोरूले आणि एनएसएसचे स्वयंसेवक निलेश पाटोळे, आदर्श जाधव,महेश सुतार,विशाल कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय हेरवाडे यांनी केले तर आभार प्रा.डी.व्ही.गोरे यांनी मानले.
