मुरगूड ( शशी दरेकर ):
बोरवडे तालूका कागल पैकी अज्ञातदत्तनगर कुंभारवाडा येथील बंद घरचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने २ लाख ५ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना काल घडली . घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.
या बाबतची हकीकत अशी की प्रतिक प्रकाश बोटे वय ३४ वर्षे धंदा शेती व होलसेल औषध व्यापार सद्या राहणार नाना पाटील नगर कोल्हापूर यांच्या दत्तनगर कुंभारवाडा येथील बंद घराचा कडी कोयंडा उचकडून घरातील तिजोरीच्या लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १,१००००/- रुपये किमतीची सोन्याची चेन,
एक तोळा वजनाची रुपये ५०,०००/- किंमतीची सोन्याची आंगठी, रुपये १५,०००/- किमतीची ३ ग्रॅम सोन्याची कानातील फुले, रुपये १५,०००/- किमतीची ३ ग्रॅमची सोन्याची बटन फुले, रुपये १५,०००/- किमतीच्या सोन्याच्या कानातील साखळ्या यांचा समावेश आहे.
मुरगूडचे सपोनि शिवाजी करे अधिक तपास करीत आहेत.
बोरवडे येथून अज्ञात चोरट्या कडून २ लाख ५ हजार किंमतीचा ऐवज लंपास.
Advertisements
AD1