किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान
मुरगुड ( शशी दरेकर )
कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत चुरशीने 88.43% इतके मतदान केले. 10128 मतदानापैकी 8956 मतदानाची नोंद झाली. मतदानाची ही आकडेवारी 88.43 इतकी होते.
किरकोळ बाचाबाची वगळता सर्व केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते मतदारांना हात जोडून मतदान करण्याची विनंती करत होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहासिनी पाटील व तसनीम जमादार यांनी सर्वच मतदान केंद्राला भेटी देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

आज दिवसभरात वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी खासदार संजयदादा मंडलिक, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील,विश्वजीत पाटील यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.


प्रभाग निहाय झालेले मतदान असे :-
प्रभाग क्रमांक 1 एकूण मतदान 869 झालेले मतदान 749 एकूण 86.19 टक्के
प्रभाग क्रमांक दोन एकूण मतदान 1005 झालेले मतदान 867 86.27%
प्रभाग क्रमांक तीन एकूण मतदान 826 झालेले मतदान 714 86.44%
प्रभाग क्रमांक चार एकूण मतदान 1021 झालेली मतदान 898 एकूण टक्केवारी 87.09%
प्रभाग क्रमांक पाच एकूण मतदान 1246 झालेले मतदान 1073 एकूण टक्केवारी 86.11%
प्रभाग क्रमांक सहा एकूण मतदान 978 झालेले मतदान 893 एकूण टक्केवारी 91.30%
प्रभाग क्रमांक सात एकूण मतदान 1175 झालेली मतदान 1049
एकूण टक्केवारी 89.27%
प्रभाग क्रमांक आठ एकूण मतदान 990 झालेले मतदान 920 एकूण टक्केवारी 92.92%
प्रभाग क्रमांक नऊ एकूण मतदान 1095 झालेले मतदान 977 एकूण टक्केवारी 89.22%
प्रभाग क्रमांक दहा एकूण मतदान 923 झालेले मतदान 816 एकूण टक्केवारी 88.40%