शुभांगी आकाश दरेकर वार्ड क्र .५ मधील उमेदवार
मुरगूड ( शशी दरेकर )
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. नामदार हसनसो मुश्रीफ साहेब व शाहु ग्रुप चे सर्वे सर्वा राजे समरजितसिंह घाटगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व गोकुळचे माजी चेअरमन मा.रणजितसिंह पाटील व मुरगूडचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष मा. राजेखान जमादार यांच्या सहकार्याने व विश्वासाने मला उमेदवारी मिळाली. आणि त्यांचा विश्वास मी सार्थ करुन तर दाखवेनच पण जेंव्हा मी नगरसेविका म्हणून मी निवडून येईन तेंव्हा सर्वात आधी मला सी सी टीव्ही, महिलासाठी स्वच्छतागृह हे काम पुर्ण करायचे आहे. एसटी बसस्थानक सोडले तर महिलासाठी बाजारपेठेसह इतरत्र कोठेही स्वच्छतागृह नाही, वॉर्डातील जेष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्याच बरोबर माझे सगळ्यात मोठे उद्दिष्ट व ध्येय हे आहे की, मला माझ्या कुवतीप्रमाणे गोरगरीब लोकांसाठी फौंडेशन काढायचं आहे त्यामार्फत मला गरीब लोकांना औषध पुरवठा, घरातील राशन, किरकोळ दवाखाना असेल, त्यांना शासकीय कार्यालयात त्रास होतो तर त्या ठिकाणी स्वतः जावून ती कागदपत्रे पुर्ण करुन देणेची जबाबदारी स्वीकारायची आहे..
वॉर्डात ज्येष्ठ महिलांसाठी विरंगुळा केंद्र काढायचे आहे… अशी जी आजपर्यंत कोणीही न केलेली कामे आम्हाला या माध्यमातून करायची आहेत.. त्याच बरोबर याआधी सुद्धा गरीब लोकांच्या घरकुलच्या फाईल असूदेत, बांधकाम कामगार दाखला देताना त्यांना आपण विनामूल्य सर्व मदत केलेली आहे व गरिबीतुन आल्यामुळे गरिबीची जाण राहील असा विश्वास लोकांना आहे..
मला तुमची साथ हवी आहे..
तुमच्या सर्वांच्या आशिर्वादानेच मी कार्यरत राहीन. आमच्या घडयाळ या चिन्हा समोरील बटण दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा.
सी.सी.टी.व्ही. महिलासाठी स्वच्छता गृहे व इतर कामानां प्राधान्य देणार..
Advertisements
AD1