टी इ टी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची संयुक्त कामगिरी

नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मुरगूड ( शशी दरेकर ):

आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

सदरच्या टोळीची व्याप्ती फार मोठी असण्याची शक्यता असून मुरगुड पोलीस या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.
   
आज राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लाखो परीक्षार्थी शिक्षक समाविष्ट झालेले आहेत अनेक केंद्रावरती ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र हा पेपरच फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये काही शाळेतील परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग असून हे सर्व आरोपी कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मध्ये सर्व आरोपी कागल आणि राधानगरी तालुक्यातील आहेत. काल सायंकाळपासून रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत असून अजूनही संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!